Majha Gaon Majha Jilha : गाव-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 27 June 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMajha Gaon Majha Jilha : गाव-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 27 June 2024
मुसळधार पावसाची जुलैपर्यंत प्रतीक्षा, जून महिन्यातील उर्वरित दिवसही कोरडेच जाणार, हवामान खात्य़ाचा अंदाज.
बुलढाण्याच्या अंबा बरवा अभयारण्यात पिसारा फुलवून मोराचं नृत्य, वन्य जीव अधिकारी सुनील वाकोडे यांच्या कॅमेऱ्यात मोराचं नृत्य कैद.
स्नेहभाव पालखीचे मनमाडहून पंढरपूरकडे प्रस्थान, पालखीला ४६ वर्षांची परंपरा, शहरात ठिकठिकाणी पालखीचे स्वागत.
कोकण रेल्वेचा ३० जून ते ३० जुलैदरम्यान मेगाब्लॉक, नेत्रावती, मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल, या गाड्यांचा प्रवास पनवेल स्थानकापर्यंत सीमित राहणार.
लातूर नीटप्रकरणाचा तपास सीबीआयकडे, आतापर्यंत दोन जणांना अटक तर दोघे फरार, फरार झालेल्या दोघांचा तपास सुरु.
सर्वात जास्त पेपरफुटी उद्धव ठाकरेंच्या काळात झाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला.
विधान परिषदेत राष्ट्रवादीला पूर्व विदर्भात संधी द्यावी, राष्ट्रवादीच्या नेत्यांची अजित पवारांकडे मागणी.