Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 30 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

 Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  30 नोव्हेंबर  2024 : ABP Majha  

राज्याच्या राजकारणात सध्या इव्हीएमचा मुद्दा प्रचंड गाजत आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळलेलं यश हे इव्हीएम घोटाळ्याचे यश असल्याचे मविआचे अनेक नेते म्हणत आहेत. इव्हीएमच्या समर्थनार्थ भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी काल मुंबईत आंदोलन केलं होतं. यानंतर भाजपच्या आणखी एका आमदारानं इव्हीएमच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. विक्रमसिंह पाचपुते यांनी इव्हीएमच्या प्रक्रियेवर विश्वास असल्याचं म्हटलं आहे.  निवडणूक आयोगावर विश्वास आहे, या प्रक्रियेत काही घोटाळा असेल तर पहिल्यांदा समोर येईन आणि निवडणुकीला सामोरं जाईन असं म्हटलं आहे.   विक्रमसिंह पाचपुते काय म्हणाले?  भाजपचे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी EVM संदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. विक्रमसिंह पाचपुते यांनी इव्हीएमची प्रक्रिया 2019 ला जवळून पाहिल्याचं सांगितलं. बबनदादा पाचपुते यांच्या निवडणुकीवेळी निवडणूक प्रतिनिधी म्हणून मतमोजणी केंद्रात होतो. त्यावेळी समोरच्या उमेवारानं आक्षेप घेतला होता. त्यावेळी समोरच्या उमेदवारानं आक्षेप घेतले होते. यानंतर व्हीव्हीपॅटची मतं आणि इव्हीएमची मतं मोजली गेली होती. ती दोन्ही बरोबर राहिली होती, त्यात काही चूक नव्हती, असं विक्रमसिंह पाचपुते म्हणाले. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram