Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 8 AM: 23 June 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 8 AM: 23 June 2024
नीट परीक्षा पेपर फुटीप्रकरणी लातूरचे दोन शिक्षक नांदेड एटीएसच्या ताब्यात. एक शिक्षक लातूर झेडपी चे तर दुसरे सोलापूर झेडपीचे
आज होणारी नीट पीजी परीक्षा अचानक रद्द. नीट युजीपाठोपाठ नीट पीजीमध्ये घोळ झाल्याची शंका, लवकरच नवी तारीख जाहीर होणार
नीटमध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या 1,563 विद्यार्थ्यांची आज फेरपरीक्षा, नीटमधील घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे
१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना पेन्शन देणार. जळगावातील कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन.
विधानसभेच्या जागावाटपाबाबत मविआ नेत्यांची उद्या बैठक, सत्ता परिवर्तनसाठी विधानसभा एकत्रितपणे लढवण्याचा निर्धार
छगन भुजबळांकडून राजकीय आरक्षणाची मागणी, जातीय विरोध केला नाही तरी पंकजा मुंडेंना बीडमधून का पाडलं, भुजबळांचा सवाल
सत्ताधारीच ओबीसींना आंदोलन करायला लावतात, जरांगेंचा ओबीसी नेत्यांवर गंभीर आरोप.. तर आज सकाळी १० वाजता जरांगेंची पत्रकार परिषद
शेतीच्या पाणीपट्टीत २० टक्क्यांनी वाढ, विधीमंडळ अधिवेशनात आवाज उठवण्याचा पटोलेंचा इशारा...तर पाणीपट्टीची ही वाढ मविआ काळातीलच, फडणवीसांचं स्पष्टीकरण...