Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 17 डिसेंबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 17 डिसेंबर 2024 : ABP Majha  

'वन नेशन, वन इलेक्शन'ची (One Nation One Election) सध्या देशात बरीच चर्चा आहे. संपूर्ण देशभरात एकदाच निवडणूक (Elections 2024) घेण्यात आली, तर त्यातून होणाऱ्या फायद्यांची यादीच सध्या सत्ताधारी पक्षांकडून वाचून दाखवली जात आहे. 'वन नेशन, वन इलेक्शन'ची अंमलबजावणी झाली तर, त्यातून खर्च कमी होईल, प्रशासकीय कार्यक्षमता वाढेल, असं सत्ताधारी पक्षाचं म्हणणं आहे.

बऱ्याच काळानंतर केंद्र सरकार (Central Government) आज (मंगळवारी) 'वन नेशन, वन इलेक्शन' विधेयक हिवाळी अधिवेशनात लोकसभेत सादर केलं जाणार आहे. कायदामंत्री अर्जुन मेघवाल जवळपास दुपारी 12 वाजता विधेयक सादर करतील. भाजपनं आपल्यासर्व खासदारांसाठी व्हिप जारी केला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारच्या विधेयकाला एनडीएच्या घटक पक्षांचाही पाठिंबा मिळाला आहे, तर दुसरीकडे विरोधकांनी या विधेयकाला कडाडून विरोध करण्याची योजना आखली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज लोकसभेत या विधेयकावर विरोधकांकडून गदारोळ होण्याची शक्यता आहे. गेल्या गुरुवारी, मोदी सरकारनं एक मोठं पाऊल उचललं आणि भारतात 'वन नेशन, वन इलेक्शन' या कायद्याशी संबंधित विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केलं. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात मंत्रिमंडळानं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उच्चस्तरीय समितीच्या प्रस्तावांनाही मंजुरी दिली होती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram