Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 1 डिसेंबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  1 डिसेंबर 2024 : ABP Majha 

राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल (Vidhan Sabha Nivadnuk 2024) हाती येऊन तब्बल आठवडा उलटला तरीदेखील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी (Maharashtra CM) कोण विराजमान होणार? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. निवडणुकीत भाजपनं (BJP) तब्बल 137 जागांवर विजय मिळवला आहे, त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होणार, यावर कुठे शिक्कामोर्तब होणार तेवढ्यात राज्यात मराठा मुख्यमंत्री असावा, म्हणून पुन्हा एकदा अमित शहांनी (Amit Shaha) शहानिशा केल्याची माहिती समोर आली. अशातच आता नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीखही ठरली आहे. तरी, नेमकं मुख्यमंत्री कोण? हे मात्र अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेलं नाही. पण, तसं असलं तरी भाजपकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं नाव आधीच निश्चित असल्याचं मानलं जात आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला होणार असल्याची घोषणा केली. महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत. पण, मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत मात्र सस्पेन्स कायम ठेवण्यात आला. अशातच आता अजितदादांच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या सर्व राजकीय तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram