Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 12 डिसेंबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 12 डिसेंबर 2024 : ABP Majha 

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) मला जी जबाबदारी देतील, ती घ्यायला मी तयार आहे. असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे (Dilip Walse Patil) पाटलांनी मंत्री पदासाठी इच्छुक असल्याचं अखेर बोलून दाखवलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते. 

दिलीप वळसे पाटील म्हणाले, माझी प्रकृती खालावलेली आहे, अशी अफवा पसरवली जातीये. मात्र माझी तब्येत उत्तम असून मी पूर्ण कार्यक्षमतेने काम करतोय. त्यामुळं वरिष्ठ देतील ती जबाबदारी स्वीकारायला मी तयार आहे. मला कोणतं पद द्यायचं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील. असं म्हणत मी मंत्री पदासाठी इच्छुक असल्याचं वळसेंनी अखेर बोलून दाखवलंय. 

परभणीतील तणावाबाबत मला फारशी कल्पना नाही, मात्र राजकारणासाठी कोणी ही असे चुकीचे प्रकार करू नयेत, संयम बाळगून शांतता राखावी, असं आवाहन दिलीप वळसेंनी केलं. त्यासोबतच शरद पवारांवर वक्तव्य करणाऱ्यांनी सुसंस्कृतपणा राखावा, असा सल्लाही दिलीप वळसे पाटलांनी महायुतीतील वाचाळवीरांना दिला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram