Majha Gaon Majha Jilha at 630AM 13 January 2025 माझं गाव, माझा जिल्हा
Majha Gaon Majha Jilha at 630AM 13 January 2025 माझं गाव, माझा जिल्हा
वाल्मिक कराडवर मकोका लावण्याच्या मागणीसाठी संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आज टॉवरवर चढून आंदोलन करणार, हत्येप्रकरणी वाल्मिक कराडवर कारवाई का केली नाही, धनंजय देशमुखांचा सवाल.
सरपंच हत्येप्रकरणी मस्साजोगच्या ग्रामस्थांचा निर्वाणीचा इशारा, कराडवर मकोका न लावल्यास सामूहिक आत्मदहन करणार, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा संक्रातीच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा.
छगन भुजबळांची समता परिषद अॅक्टीव्ह, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढण्याची तयारी, मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात गाव तिथे शाखा आणि प्रत्येक घरात समता सैनिक तयार करण्याची रणनीती.
बुलढाण्यातील शेगावात माळी समाजाच्या युवक युवती परिचय संमेलनाचं उद्घाटन, मंत्री छगन भुजबळांनी लावलेली हजेरी, जात निहाय जनगणना करा किंवा ओबीसी ५१ टक्के आहेत हे जाहीर करा, भुजबळांची मागणी.
माझा पतंग कुणी कापला नाही, पण मी अनेकांचे पतंग कापले, छगन भुजबळांचं विधान, भुजबळांचा रोख कुणावर? प्रश्न उपस्थित.