Majha Gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा | 7.30 AM | 11 Jan 2025 | ABP Majha

Majha Gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा | 11 Jan 2025 | ABP Majha 


सरपंच संतोष देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येच्या निषेधार्थ आज वाशिममध्ये मोर्चा, सर्वपक्षीय होणार मोर्चात सहभागी 
संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणी मुख्य आरोपी सुदर्शन घुलेनं हत्येआधीच आवादा एनर्जी कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याला धमकावलं होतं, तक्रारदार सुनील शिंदे यांनी केलेल्या तक्रारीत उल्लेख. 
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जिल्ह्यात पाठवणार दिल्लीची टीम,  सरकारकडून मागवणार अहवाल, बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्याने मानव अधिकार आयोगात गुन्हा दाखल. 
आता न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही, ३६ जिल्ह्यात मोर्चा काढणार, पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांचा जालन्यातील मोर्च्यातून इशारा.  
जालन्यातील मोर्चात सहभागी झाल्यानंतर मनोज जरांगे रुग्णालयात दाखल, अस्वस्थ वाटू लागल्यानं छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती.  
नाशिकमध्ये काँग्रेस आणि शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतून महायुतीत इन्कमिंग सुरू. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola