Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 09 October 2024 : 7.30 AM : ABP Majha
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 09 October 2024 : 7.30 AM : ABP Majha
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रमाचं आज रायगडात आयोजन. मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित,
50 हजार महिला उपस्थित राहणार असल्याचा दावा.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 वर आज जड वाहतुकीला बंदी, माणगाव ते दिघी हा राष्ट्रीय महामार्ग सकाळी ६ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत राहणार बंद
एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब.
अजित पवारच बारामती विधानसभेतून निवडणूक लढवणार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांची घोषणा.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीतून उभे राहावं यासाठी कार्यकर्ते गाडीसमोर आक्रमक, अजित पवारांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करावी, कार्यकर्त्यांची मागणी.
अमरावतीच्या मेळघाट, दर्यापूरात शिवसेनेविरोधात उमेदवार देणार, अपक्ष आमदार रवि राणा यांचा इशारा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार बच्चू कडू यांच्यामध्ये साठ गाठ असल्याचा रवि राणांचा आरोप.