Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 08 October 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा :  08 October 2024 : ABP Majha
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आज सोलापूर दौऱ्यावर. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार. 
मविआत जाण्याचा इशारा देणाऱ्या चिंचवडच्या समर्थकांची अजित पवारांसोबत बैठक, चिंचवडची जागा राष्ट्रवादीला मिळावी कार्यकर्त्यांची मागणी, अजित पवारांकडून मनधरणी.
पाचोरामध्ये शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याला भाजप पदाधिकाऱ्यांची गैरहजेरी, पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी आपल्या भाषणात व्यक्त केली खंत.
जालन्यात विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान गोंधळ,  विद्यमान काँग्रेस आमदार कैलास  गोरंट्याल आणि काँग्रेस नेते अब्दुल हाफिज यांच्या समर्थकांमध्ये राडा.
हा गोंधळ नव्हता तर उमेदवारांनी केलेलं  शक्ती प्रदर्शन होतं, कार्यकर्त्यांनी आपापल्या उमेदवाराला सपोर्ट करण्यासाठी घोषणाबाजी केली, डॉ.शोभा बच्छाव यांचं वक्तव्य
सांगलीच्या तासगावमध्ये आजी - माजी खासदारांमध्ये जोरदार खडाजंगी, तासगाव नगरपालिकेच्या नवीन वास्तू उद्घाटनप्रसंगी खासदार विशाल पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटलांमध्ये श्रेयवादावरून राडा. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram