Majha gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा | 04 Jan 2025 | ABP Majha

Continues below advertisement

सातारा दौर्‍यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली संभाजी भिडे यांची भेट. शिरवळ इथं दोघांची झाली भेट. ️यावेळी फडणवीसांनी स्वागतासाठी आणि दिलेल्या आशीर्वादासाठी भिडे गुरुजी यांचे मानले आभार.
बीड जिल्ह्याचं पालकत्व अजित पवारांनी करावं ही माझी आधीपासून इच्छा, अजित पवार बीडचे पालकमंत्री झाले तर स्वागतच, खासदार बजरंग सोनवणेंचं वक्तव्य. 
पालकमंत्रिपदाबाबत येत्या २ ते ३ दिवसांत निर्णय होईल, भुजबळांसोबतही लवकरच चर्चा होईल, राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरेंची माहिती.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे अॅक्शन मोडवर, डिसेंबर महिन्यात धान्यापासून वंचित राहिलेल्या शिधापत्रिका धारकांचा घेतला आढावा, प्रत्येक जिल्ह्यातील धान्य वितरणाची वस्तुनिष्ठ माहिती घेऊन १०० टक्के वितरणासाठी केल्या सूचना.
सरकारला शेतकऱ्यांचं सोयाबीन घ्यायचंच नाही म्हणून बारदाना उपलब्ध नाही असं प्रशासनाकडून सांगितलं जातंय, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचा आरोप.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram