Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 19 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  8 AM :  19 नोव्हेंबर  2024 : ABP Majha 

 राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाली असून त्यांच्या डोक्याला जबर जखम झाली आहे. अनिल देशमुख हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काटोलकडे जात असताना बेलफाट्याजवल अज्ञात व्यक्तीने हा हल्ला केला आहे. हा हल्ला भाजपच्या लोकांनीच केल्याचं अनिल देशमुखांनी म्हटल्याचं व्हिडीओतून समोर आलं आहे.   सोमवारी संध्याकाळी काटोल विधानसभा मतदारसंघामधील नरखेड येथील सांगता सभा आटोपल्यानंतर अनिल देशमुख तीनखेडा भिष्णूर मार्गाने परत येत होते. त्यावेळी काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाडीवर दगड फेकला. यात अनिल देशमुख यांच्या वाहनाची समोरची काच फुटली आणि त्याचे तुकडे आतल्या बाजूला उडाले. त्यामुळे अनिल देशमुख जखमी झाल्याचे बोलले जात आहे.   Anil Deshmukh Car Attack : नेमकं काय घडलं?  बेलफाट्यावर आल्यानंतर अनिल देशमुखांच्या गाडीसमोर एक व्यक्ती आला आणि त्याने एक मोठा दगड देशमुखांच्या गाडीच्या समोरच्या काचेवर मारला. त्यामध्ये अनिल देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं.   हा हल्ला झाल्यानंतर अनिल देशमुखांना काटोलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. देशमुखांना झालेली जखम खोलवर झाली नाही असं डॉक्टरांचं म्हणणं नाही. देशमुखांवर सध्या उपचार सुरू आहेत.   हल्ला करणारे हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप यावेळी जखमी झालेले अनिल देशमुख यांनी केल्याचं दिसतंय. ही दगडफेक कोणी केली हे अद्याप स्पष्ट झालं नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram