Majh Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 28 जुलै 2024 : ABP Majha
मुसळधार पावसामुळे भाज्या खराब होत असल्याने दर कडाडले, चवळी, हिरव्या वाटाण्यासह कडधान्येही महागली, तर टॉमेटोच्या दरानेही शंभर गाठली
मुसळधार पावसामुळे नागपूरच्या तोतलाडोह प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडले, तर निम्न वेणा धरणाचे 21 दरवाजे आणि नांद धरणाचे 7 दरवाचे उघडले असून धरणातून 1 हजार 867 क्युसेकने पाण्याचा विसर्ग.
भंडारा शहरात ७७ मिलिमीटर पावसाची नोंद, अनेक घरात शिरलं पावसाची पाणी, आठवडाभरात पुन्हा एकदा पूरपरिस्थिती.
भंडाऱ्याच्या खात रोडवरील पूरबाधितांचं भर पावसात आंदोलन, प्रत्येक वेळी येणाऱ्या मुसळधार पावसानंतर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरत असल्यानं नागरिक संतप्त.
भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, तीस पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला, रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतुकीसाठी मार्ग बंद.
भंडाऱ्यात मुसळधार पाऊस, गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमामात वाढ, गोसीखुर्द धरणातून 3 लाख 2 हजार 702 क्यूसेक पाण्याचा विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन
कोल्हापूरमधल्या पूरस्थितीची खासदार शाहू महाराजांकडून पाहणी, यावेळी आमदार सतेज पाटलांचीही उपस्थिती, आजरा, चंदगड, कोवाड इथल्या नगरिकांशी साधला संवाद.
कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात दमदार पाऊस, ताम्रपर्णी आणि घटप्रभा नदीचे पाणी पात्राबाहेर, भाजप नेते शिवाजीराव पाटलांकडून पूरस्थितीची पाहणी.