Majh Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 30 जुलै 2024 : ABP Majha

Continues below advertisement

उरण हत्याप्रकरणातील संशयित आरोपी दाऊद शेखचं सीसीटीव्ही फूटेज समोर, २५ जुलैला दुपारी २ वाजून २२ मिनीटांनी यशश्रीचा पाठलाग करताना कॅमेरानं टिपलं, याच दिवशी हत्येनंतर दाऊद शेख फरार.  

 संशयित आरोपी दाऊद शेखला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचा कर्नाटकमध्ये शोध सुरू, जेलमधून सुटल्यानंतर दाऊदने तरूणीची हत्या केल्याची शक्यता.

उरण हत्याकांड प्रकरणी कर्नाटकातून मोहसीन नावाच्या व्यक्तीला नवी मुंबई पोलिसांकडून अटक, मोहसीन फोनवर सातत्यानं तरुणीच्या संपर्कात असल्याचे पोलीसांकडे पुरावे असल्याची माहिती.  

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि किशोरी पेडणेकर यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची घेतली भेट.  तरूणीच्या हत्येप्रकरणी आरोपीला अटक करून कडक कारवाईची केली मागणी. 

उरण हत्याकांड प्रकरणी ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे आंदोलन. जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड आंदोलनात सहभागी. दोषींना फाशी देण्याची केली मागणी. 

सरकार विविध योजनांच्या जाहिरातीवर २७० कोटी ५ लाख खर्च करणार. बाह्यप्रसिद्धीसाठी १३६ कोटी ३५ लाख रूपये तर इलेकट्राॅनिक माध्यमातून प्रसिद्धीसाठी ३९ कोटी ७० लाख रुपयांची तरतूद.  

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेत सहभागासाठी ५  ऑगस्टपर्यंत अर्ज करा,   मंत्री मंगल प्रभात लोढांंचं आवाहन.  

राज्यातील दिव्यांग बांधवांना यंदाही रोजगार, स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षा वाटप करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय, दिव्यांग बांधवांसाठी पुनर्वसन केंद्र महापालिकांनी सुरू करण्य़ाचेही दिले निर्देश. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram