Majh Gaon Majha Jilha : तुमच्या गावातील बातम्या एका क्लिकवर : माझं गाव माझा जिल्हा : 25 जुलै 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMajh Gaon Majha Jilha : तुमच्या गावातील बातम्या एका क्लिकवर : माझं गाव माझा जिल्हा : 25 जुलै 2024
अतिवृष्टीमुळे लोणावळ्यातील बारावीपर्यंतच्या शाळांना आज आणि उद्या सुट्टी, दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय.
मुसळधार पावसामुळे कराडमध्ये कृष्णा नदीवराचा युयाचीवाडीतील बंधारा वाहून गेला, तर अजिंक्यताऱ्याच्या मुख्य दरवाजासमोरील बुरूजाच्या खालचा भाग कोसळला.
बीडच्या पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील रामेश्वर धबधब्यावर पर्यटकांची गर्दी, 70 मीटर उंचीवरून दरीत 500 फूट खाली कोसळत असलेल्या धबधब्याचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी.
गडचिरोली जिल्ह्यात पावसामुळे अडकलेल्या गरोदर माता आणि प्रवाशांची सुटका, आपत्ती आपत्ती व्यवस्थापन आणि NDRF च्या टीम ने महिलांना सुरक्षित स्थळी हलवलं.
सांगलीच्या कृष्णा नदीवरील आयर्विन पुलावरून उड्या मारण्यास पोलिसांकडून मनाई, कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने नदी काठावर न जाण्याचं नागरिकांना आवाहन
नंदुरबारमध्य़े एसटीच्या छतातून पाणी गळत असल्याने प्रवाशांचे हाल, सीटच्या ठिकाणीच पाणी गळत असल्याने विद्यार्थ्यांचा १५ किलोमीटर उभ्याने प्रवास, एसटी प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष.
अहमदनगरमध्ये आयशर टेम्पोचा भीषण अपघात, शहरातील उड्डाण पुलावरून टेम्पो खाली पडला, अहमदनगर -पुणे महामार्गावरील सोलापूर चौकात अपघात.