Mahesh Tapase on NCP Chief : शरद पवारांनीच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर कायम राहावं - महेश तपासे
Mahesh Tapase on NCP Chief : शरद पवारांनीच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर कायम राहावं - महेश तपासे
मुंबई: राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं असं शरद पवारांनी म्हटलं आहे. अध्यक्षपदासाठी जी समिती नेमली आहे त्यांनी 5 मे रोजी बैठक घ्यावी, त्यात जो काही निर्णय येईल तो आपल्याला मान्य असेल असंही ते म्हणाले. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया आली आहे.
शरद पवार म्हणाले की, मी वरीष्ठांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे होतं असं मला आता जाणवत आहे. जर मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर स्वाभाविकरित्या सर्वांनी मला विरोध केलाच असता. म्हणून मी हा निर्णय माझ्या मनाशी एकमत करून घेतला. पण आपण 6 मेची बैठक 5 मे रोजीच घ्या, समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल.
शरद पवार पुढे म्हणाले की, 1 मे1960 रोजी मी मी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली होती, त्यामुळे माझं 1 मे सोबत माझं वेगळं नातं आहे. मी युवक काँग्रेसच्या बैठकीत भाकरी फिरवण्याचं वक्तव्य केलं होतं. मी युवकांची मतं विचारात घेणारा नेता आहे. त्यामुळे तुमच्या मतांचा मी आदर करतो. ग्रामीण भागातील युवक आणि युवतींना मुख्य प्रवाहात आणायचे आहे.