Mahesh Tapase NCP : आम्हाला 160 पेक्षा जास्त जागा मिळतील

Continues below advertisement

Mahesh Tapase NCP :  आम्हाला 160 पेक्षा जास्त जागा मिळतील

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. शनिवारी सकाळी 8 वाजता राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या (Mahayuti) गोटात हालचालींना सुरुवात झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार,  एक्झिट पोलचे निकाल (Maharashtra Exit Poll 2024) समोर आल्यानंतर महायुतीने प्लॅन बी आखल्याची माहिती समोर आली आहे. 

विधानसभा निवडणुकीत बहुमतापासून दूर राहिल्यास महायुतीने छोट्याछोट्या पक्षांची मोट बांधायची रणनीती आखली आहे. जे पक्ष महायुतीत नाहीत, अशांशी संपर्क साधला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  आम्ही कोणत्याही अपक्षांच्या संपर्कात नसल्याचे गुरुवारी सांगितले होते. मात्र, महायुतीच्या गोटातून अपक्ष आणि बंडखोरांनी संपर्क साधण्यास सुरुवात झाल्याची माहिती आहे. महायुतीचे नेते छोट्या घटकपक्षांशी बोलणी करत आहेत. केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे आता राज्यात सत्तेतील वाटा देऊन घटक पक्षांना जवळ करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची माहिती आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram