Mahesh Sawant Mahim Vidhan Sabha | ठाकरे गटाकडून माहीममधून महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणात

Continues below advertisement

Mahesh Sawant Mahim Vidhan Sabha | ठाकरे गटाकडून माहीममधून महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणात

 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वात रंजक लढत आता माहीम विधानसभा मतदारसंघात होणार आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना उमदेवारी जाहीर केल्यानंतर, उद्धव ठाकरेंची शिवसेना कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर आज पदाधिकाऱ्यांच्या बैठीक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महेश सावंत यांना माहीम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात शिवसेना शिंदेंकडून आमदार सदा सरवणकर यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे आता सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे विरुद्ध महेश सावंत अशी तिहेरी लढाई दादर माहीम मतदारसंघात होणार आहे.  महेश सावंत मातोश्रीवरुन बाहेर पडल्यानंतर काय म्हणाले? आज उद्धव साहेबांना माहीममधून माझ्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली आहे. आम्ही सगळेजण मेहनत करुन आम्ही पुन्हा डौलाने माहीम मतदारसंघावर, प्रभादेवी, दादरवर शिवसेनेचा भगवा फडकवणार आहोत. कितीजणांचं आव्हान असेल, तरी जनतेला रोज, रात्री-अपरात्री भेटणारा उमेदवार जनतेला भेटलाय, जनतेच्या मनातला उमेदवार भेटलाय.  त्यामुळे आम्हाला कोणाचं आव्हान वाटत नाही. बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव साहेबांची शिवसेना जशी काम करते, तसंच आम्ही काम करणार आहोत. शेवटी विजय ठाकरे गटाचाच होणार आहे. 23 तारखेला आम्ही जल्लोषमध्ये आम्ही तुमच्याशी बोलू. पक्षप्रमुखांनी सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र बसवलं. आम्हाला म्हणाले की, मला बाकी काही नको, माहीमवर भगवा फडकलाच पाहिजे, असे उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचे महेश सावंत यांनी म्हटले.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram