Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या

Continues below advertisement

Mahendra Dalvi cash video: शिंदे गटाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ ट्विट केला होता. सरकारकडे शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत, मग इतके पैसे कुठून आले, असा सवाल अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी विचारला होता. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या व्हिडीओत महेंद्र दळवी (MLA Mahendra Dalavi) व्हिडीओ कॉलवर बोलत असून त्यांचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे. ते बॅगेतून एकापाठोपाठ बंडलं (Cash) काढून ती टेबलवर ठेवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर महेंद्र दळवी गोत्यात आले होते. मात्र, 'एबीपी माझा'शी बोलताना महेंद्र दळवी यांनी आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले. एकीकडे ते अंबादास दानवे यांनी हा व्हिडी

Mahendra Dalvi cash video: शिंदे गटाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ ट्विट केला होता. सरकारकडे शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत, मग इतके पैसे कुठून आले, असा सवाल अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी विचारला होता. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या व्हिडीओत महेंद्र दळवी (MLA Mahendra Dalavi) व्हिडीओ कॉलवर बोलत असून त्यांचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे. ते बॅगेतून एकापाठोपाठ बंडलं (Cash) काढून ती टेबलवर ठेवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर महेंद्र दळवी गोत्यात आले होते. मात्र, 'एबीपी माझा'शी बोलताना महेंद्र दळवी यांनी आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले. एकीकडे ते अंबादास दानवे यांनी हा व्हिडीओ मॉर्फ केला, माझा काहीही संबंध नाही, असे म्हणताना दिसत आहेत. मात्र, त्याचवेळी व्हिडीओतील लाल टी-शर्टमधील व्यक्ती कोण, असा सवालही त्यांनी विचारला. त्यामुळे हा व्हिडीओ खरा आहे, फक्त त्यामधील व्यक्ती कोण, हे अंबादास दानवे यांनी सांगावे, असेही महेंद्र दळवी यांनी म्हटले. त्यामुळे पैशांची बंडलं मोजतानाचा हा व्हिडीओ महेंद्र दळवींचाच आहे की नाही, याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. 

महेंद्र दळवी यांनी या सगळ्या प्रकारावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे यांच्यावर आगपाखड केली. अंबादास दानवेंनी तो व्हिडीओ नीट दाखवावा. लाल टीशर्टमधील व्यक्ती कोण, हे त्यांनी सांगावे. मी व्हिडीओत असेल तर मी आमदारकीचा राजीनामा देईन. ब्लॅकमेल करणं हा अंबादास दानवेंचा धंदा आहे. त्यांच्याकडे कोणतं काम नाही, पद नाही, पक्षात त्यांना कोणी कुत्रं विचारत नाही, असे महेंद्र दळवी यांनी म्हटले.

या व्हिडीओशी माझा काहीही संबंध नाही. अंबादास दानवे यांनी तो व्हिडीओ समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यासकट दाखवावा. त्यांनी व्हिडीओ कट करुन दाखवू नये. मला व्हिडीओबद्दल काहीही माहिती नाही. अंबादास दानवे यांनी पुरावे घेऊन हा व्हिडीओ माझाच आहे, हे सिद्ध करुन दाखवावे. अंबादास दानवेंनी व्हिडीओ मॉर्फ केला आहे. अंबादास दानवेंना कोणी सुपारी दिली हे सांगावे. अंबादास दानवे सुपारीबाज नेता आहे, अशी टीका महेंद्र दळवी यांनी केली.

ओ मॉर्फ केला, माझा काहीही संबंध नाही, असे म्हणताना दिसत आहेत. मात्र, त्याचवेळी व्हिडीओतील लाल टी-शर्टमधील व्यक्ती कोण, असा सवालही त्यांनी विचारला. त्यामुळे हा व्हिडीओ खरा आहे, फक्त त्यामधील व्यक्ती कोण, हे अंबादास दानवे यांनी सांगावे, असेही महेंद्र दळवी यांनी म्हटले. त्यामुळे पैशांची बंडलं मोजतानाचा हा व्हिडीओ महेंद्र दळवींचाच आहे की नाही, याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. 

महेंद्र दळवी यांनी या सगळ्या प्रकारावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे यांच्यावर आगपाखड केली. अंबादास दानवेंनी तो व्हिडीओ नीट दाखवावा. लाल टीशर्टमधील व्यक्ती कोण, हे त्यांनी सांगावे. मी व्हिडीओत असेल तर मी आमदारकीचा राजीनामा देईन. ब्लॅकमेल करणं हा अंबादास दानवेंचा धंदा आहे. त्यांच्याकडे कोणतं काम नाही, पद नाही, पक्षात त्यांना कोणी कुत्रं विचारत नाही, असे महेंद्र दळवी यांनी म्हटले.

या व्हिडीओशी माझा काहीही संबंध नाही. अंबादास दानवे यांनी तो व्हिडीओ समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यासकट दाखवावा. त्यांनी व्हिडीओ कट करुन दाखवू नये. मला व्हिडीओबद्दल काहीही माहिती नाही. अंबादास दानवे यांनी पुरावे घेऊन हा व्हिडीओ माझाच आहे, हे सिद्ध करुन दाखवावे. अंबादास दानवेंनी व्हिडीओ मॉर्फ केला आहे. अंबादास दानवेंना कोणी सुपारी दिली हे सांगावे. अंबादास दानवे सुपारीबाज नेता आहे, अशी टीका महेंद्र दळवी यांनी केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola