CM Eknath shinde Special Report : फडणवीसांप्रमाणे शिंदे सहज मुख्यमंत्रीपद सोडतील ?
CM Eknath shinde Special Report : फडणवीसांप्रमाणे शिंदे सहज मुख्यमंत्रीपद सोडतील ?
विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024 Result ) राज्यातील जनतेने महायुतीला कौल दिला आहे. जनतेने महायुतीच्या पारड्यात मतांचं भरभरून दान दिलं आहे. दरम्यान, आता महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. दुसरीकडे विरोधक मात्र या निकालावर संशय व्यक्त करत आहेत. या निकालात काहीतरी घोळ आहे. ईव्हीएम हॅक करण्यात आली आहे. चुकीच्या पद्धतीने मतमोजणी करण्यात आली, असे वेगवेगळे आरोप विरोधक करत आहेत. दरम्यान, वरिष्ठ वकील असीम यांनी या निकालाविरोधात थेट न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक उमेदवार मला संपर्क करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार राज्यात लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाविरोधात असीम सरोदे थेट न्यायालयात जाणार आहेत. एवढं राक्षसी बहुमत महायुतीला मिळणं शक्य नव्हतं, असा दावा त्यांनी केलाय. तसेच लागलेला निकाल हा शंकास्पद आहे. या निकालाविरोधात अनेक उमेदवार मला संपर्क करत आहेत. या उमेदवारांनी न्यायालयात जायचं ठरवलं आहे. पराभूत झालेल्या अनेक उमेदवारांनी मला संपर्क केला आहे, अशी माहितीही असीम सरोदे यांनी दिली आहे.