Mahayuti Seat Sharing : अमित शाहांच्या घरी झालेल्या बैठकीत महायुतीचंं काय ठरलं ?

Continues below advertisement

Mahayuti Seat Sharing : अमित शाहांच्या घरी झालेल्या बैठकीत महायुतीचंं काय ठरलं ? महायुतीसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. कारण आज रात्री नवी दिल्लीत अमित शाह, जेपी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची बैठक होणार आहे. जागावाटपावर आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. मुळात, महायुतीत देखील जागावाटपावरून मतभेद आहेत हे काही लपून राहिलेलं नाही. मात्र त्यावर नवी दिल्लीत औपचारिक बैठकीत शाह, शिंदे, फडणवीस आणि अजित पवार पहिल्यांदाच चर्चेला बसणार आहेत. शिंदे गट आणि अजित पवार गटानं जरी आपापल्या मागण्या समोर ठेवल्या, तरी अमित शाह अखेर त्यांना किती जागा सोडतात ते सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे १० मार्च रोजी भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होईल अशी अपेक्षा आहे. त्यामध्ये भाजपची महाराष्ट्राची यादी फायनल होईल, आणि त्यानंतरच जागावाटप जाहीर केलं जाणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram