Mahayuti Seat Sharing : Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीला 4 हून अधिक जागा देण्यास BJP चा ठाम नकार

Continues below advertisement

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये (Mahayuti) जागावाटपाचा तिढा (Seat Sharing) अद्याप कायम आहे. जागावाटपा संबंधित चर्चा करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांचं सत्र सुरुच आहे. गेले दोन दिवस दिल्लीत मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अमित शाहांच्या निवासस्थानी बैठक झाली. मात्र, अद्याप महायुतीचं जागावाटपावर एकमत आहे. त्यातच शिंदेंना दोन अंकी जागा आणि अजित पवारांना एक अंकी जागा मिळणार असल्याची माहिती आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार गटाला फक्त चार जागांवर समाधानं मानावं लागण्याची शक्यता आहे. कारण, भाजप राष्ट्रवादी गटाचा फक्त चार जागा सोडण्याच्या विचारात आहे. इतर जागा शिंदे गट आणि भाजप वाटून घेतील, अशी माहिती आहे.  अजित पवार गटाला अवघ्या चार जागा  देण्यावर भाजप ठाम असल्याची मोठी माहिती सध्या सुत्रांकडून समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी चारपेक्षा जास्त जागा सोडण्यास भाजपचा नकार असल्याची सुत्रांची माहिती आहे. बारामती, रायगड या जागा राष्ट्रवादीला जाणं निश्चित असल्याचं समजत आहे. दोन जागांबाबत दोन दिवसांनंतर होणाऱ्या महायुतीच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला राज्यांतील घटक पक्षांचे प्रमुख आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram