Mahayuti Seat Allocation : महायुतीमध्ये 40 जागांवरून वाद? एबीपी माझाच्या हाती संभावित जागांची यादी
जयदीप मेढे
Updated at:
11 Sep 2024 08:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMahayuti Seat Allocation : महायुतीमध्ये 40 जागांवरून वाद? एबीपी माझाच्या हाती संभावित जागांची यादी
महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच जवळपास ४० मतदारसंघात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या ४० मतदारसंघांची माहिती एबीपी माझाच्या हाती लागलीय. या मतदारसंघात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीत उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. वादातल्या जागांवर लवकरात लवकर बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईतल्या बैठकीत केली होती. याबाबत याच आठवड्यात राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. पुढच्या दहा दिवसांत दिल्लीत अंतिम चर्चा होणार आहे...तशी सूचना अमित शाहांनी राज्यातल्या नेत्यांना दिल्याची सूत्रांची माहिती आहे.