Mahendra Dalavi : रोहा कुणाची मालकी नाही, आमदार महेंद्र दळवींचा निशाणा

Continues below advertisement
रायगड (Raigad) जिल्ह्यातील महायुतीमधील (Mahayuti) अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे, जिथे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर जोरदार टीका केली. 'रोहा कोणाची मालकी नाहीये, त्यांचा आता हिशोब सुटता करणार', असा थेट इशारा दळवी यांनी तटकरेंच्या बालेकिल्ल्यात दिला आहे. अनेकवेळा फसवणूक केल्याचा आरोप करत, 'फसवणे हा त्यांचा धंदा निश्चित आहे' असेही दळवी म्हणाले. रोहा येथे झालेल्या शिवसेना पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. दळवींच्या या आक्रमक पवित्र्यामुळे रायगडमधील महायुतीच्या दोन्ही पक्षांमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा वाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीसाठी अडचणीचा ठरू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola