Shaniwarwada Rada: पुण्यात महायुतीत वाद, नमाजावरून रुपाली ठोंबरे- मेधा कुलकर्णी आमनेसामने
Continues below advertisement
पुण्यातील (Pune) ऐतिहासिक शनिवारवाड्यामध्ये (Shaniwar Wada) नमाज पठण केल्याच्या मुद्द्यावरून महायुतीमध्येच राजकीय वाद पेटला आहे. भाजप खासदार (BJP MP) मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) या विषयावरून एकमेकांविरोधात आक्रमक झाल्या आहेत. 'सर्व जाती, धर्मतल्या लोकांचा हा शनिवारवाडा आहे, मेधा कुलकर्णीच्या पप्पांचा शनिवारवाडा नाही,' अशा शब्दात रुपाली ठोंबरे पाटील यांनी मेधा कुलकर्णींवर टीका केली आहे. कुलकर्णी यांनी जातीय सलोखा बिघडवल्याचा आणि समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ठोंबरे यांनी केली आहे. मेधा कुलकर्णी यांनी या घटनेचा निषेध करत आंदोलन केल्यानंतर, रुपाली ठोंबरे यांनी प्रतिआंदोलन करत भाजप खासदाराच्या भूमिकेला विरोध केला. या संपूर्ण वादामुळे पेशकालीन इतिहासाची साक्षीदार असलेली ही वास्तू पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement