Ashok Chavhan Land Scam : नांदेडमध्ये जागेवरून वाद, चव्हाणांवर गंभीर आरोप
Continues below advertisement
नांदेडमधील (Nanded) महापालिकेच्या जागेवरून महायुतीमध्ये (Mahayuti) नवा वाद पेटला असून, शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी भाजप खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'सत्तेचा गैरवापर करून ही जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ताब्यात घ्यायची आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून पैसा कमवायचा असं त्यांचं सूत्र आहे,' असा थेट आरोप हेमंत पाटील यांनी केला आहे. नांदेड महानगरपालिकेच्या मालकीची शाळा, भाजीपाला मार्केट, आणि मंगल कार्यालयाची जागा BOT तत्त्वावर विकल्याचा दावा पाटील यांनी केला. महात्मा फुले मार्केटमधील भाजी विक्रेत्यांना हटवून तिथे सोन्या-हिऱ्यांची दुकाने थाटण्यात आली आणि साठ वर्षे जुने कलामंदिर पाडण्यात आले, असेही ते म्हणाले. शिवाजीनगरमधील जनता मार्केटमधून पाच हजार कोटी रुपये कमावण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोपही पाटील यांनी चव्हाणांवर केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement