Ashok Chavhan School Alligation : नांदेडमध्ये महायुतीतच बेबनाव, अशोक चव्हाणांवर गंभीर आरोप

Continues below advertisement
नांदेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्येच अंतर्गत वाद उफाळून आला असून, शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'सत्तेचा वापर करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा ताब्यात घ्यायच्या आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून पैसा कमवायचा, हेच अशोक चव्हाण यांचे सूत्र आहे', असा थेट आरोप हेमंत पाटील यांनी केला आहे. नांदेड शहरातील महापालिकेच्या मालकीची शाळा, भाजीपाला मार्केट आणि मंगल कार्यालयाची जागा बीओटी (BOT) तत्वावर देऊन विकल्याचा दावा पाटील यांनी केला. या प्रकरणामुळे नांदेडमधील राजकीय वातावरण तापले असून महायुतीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola