Mahanagarpalika Politics: महायुतीत वादाची ठिणगी,दोन मंत्री आमनेसामने, कोण कुठे भिडले?
Continues below advertisement
कोकणातील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील संघर्ष पेटला असून मंत्री उदय सामंत आणि नितेश राणे यांच्यात थेट वाद सुरू झाला आहे. तर साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजे भोसले यांच्यासोबतच्या मनोमिलनावर शिक्कामोर्तब केले आहे. 'कुणाला खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार आहोत', असे आव्हान नितेश राणे यांनी उदय सामंत यांना दिले आहे. सामंत यांनी भाजपचे मंत्री नितेश राणे, राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम आणि नव्याने भाजपवासी झालेले प्रशांत यादव यांच्यावर टीका केली होती, ज्याला राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दुसरीकडे, साताऱ्यात दोन्ही राजे गटाचे इच्छुक उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावरच पालिका निवडणूक लढवणार असल्याचे शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्येही भाजपकडून वैभव खेडेकर यांच्या पत्नी नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याने शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement