Mahayuti Rift: 'तुम्ही युतिधर्म पाळणार नसाल, तर यादी तयार', alaji Kinikar यांचा BJP ला इशारा

Continues below advertisement
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील (Mahayuti) अंतर्गत तणाव वाढला असून, अंबरनाथमध्ये (Ambernath) शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी केणीकर (Dr. Balaji Kinikar) यांनी भाजपला (BJP) थेट इशारा दिला आहे. 'तुम्ही युतिधर्म पाळणार नसाल तर आमच्याकडेही तुमच्या नगरसेवकांची मोठी यादी तयार आहे,' असे केणीकर म्हणाले. शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेंद्र यादव (Surendra Yadav) यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने हा वाद उफाळून आला. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यपाल नियुक्त आमदार आणि महामंडळ वाटपाच्या नियुक्त्या या निवडणुकीतील कामगिरीवर अवलंबून असतील. महायुतीमध्ये इनकमिंग आणि इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे, भविष्यातील पदे मिळवण्यासाठी पक्षांना स्थानिक निवडणुकीत स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे, ज्यामुळे मित्रपक्षांमध्येच रस्सीखेच सुरू झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola