Dharamrao Baba Atram :भाजपने मला पाडण्यासाठी डमी उमेदवार उभा केला, आत्राम यांचा भाजपवर आरोप
Continues below advertisement
राज्यातील महायुती सरकारमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार धर्मराव बाबा आतराम (Dharmarao Baba Atram) यांनी थेट भाजपवर (BJP) गंभीर आरोप केले आहेत. 'भाजपाने विधानसभेच्या वेळेला आपल्याला पाडण्यासाठी पाच कोटी रुपये देऊन डमी उमेदवार उभा केला होता,' असा खळबळजनक दावा आतराम यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी काही ठिकाणी स्थानिक पातळीवर असे प्रकार घडल्याचे मान्य केले आहे. इतकेच नाही, तर मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या सांगण्यावरून येवल्यामध्ये आपल्याच काही लोकांनी विरोधात प्रचार केल्याचेही भुजबळ यांनी म्हटले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement