Voter List : मतदार याद्यांमध्ये घोळ? सत्ताधारीच आक्रमक, 48 तासांत दुबार नावं हटतील

Continues below advertisement
राज्यातील सत्ताधारी महायुतीचे आमदार मंदा म्हात्रे (Manda Mhatre), संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आणि सतीश चव्हाण (Satish Chavan) यांनी निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'निवडणूक आयोग हे सगळं अंमलबजावणी करायला जाणीवपूर्वक टाळाटाळ करतेय', असा थेट आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे. नाशिक (Nashik), बेलापूर (Belapur), बुलढाणा (Buldhana) आणि गंगापूर (Gangapur) या मतदारसंघांमध्ये मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा दावा या आमदारांनी केला आहे. बोगस आणि दुबार नावांमुळे निवडणुकीच्या निकालांवर परिणाम होत असून, पात्र उमेदवार पराभूत होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. विशेषतः, निसटत्या मताधिक्याने विजयी झालेल्या मंदा म्हात्रे आणि संजय गायकवाड यांनी दुबार नावे वगळण्याची जोरदार मागणी केली आहे. तर, सतीश चव्हाण यांनीही गंगापूर मतदारसंघातील सुमारे छत्तीस हजार दुबार नावांचा मुद्दा उपस्थित करत निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच सवाल उचलला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola