Mahayuti Meeting Today : महायुतीच्या आमदारांची मुंबईच्या ताजमध्ये बैठक,बेताल वक्तव्यांवर चर्चा होणार
Continues below advertisement
महविकास आघाडीच्या आमदारांप्रमाणेच आज महायुतीच्या आमदारांचीही बैठक होणार आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या आमदारांची आज संध्याकाळी ७ वाजता मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आमदारांना मार्गदर्शन करतील. काही नेत्यांकडून होणारी बेताल वक्तव्य, तसंच एखादी दुर्घटना घडली तर तिथं आपले नेते कसे लवकर पोहोचतील, या दोन मुद्द्यांवर या बैठकीत प्रामुख्यानं चर्चा होणार आहे.
Continues below advertisement