Mahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात 'वर्षा'वर साडेचार तास महत्वाची बैठक
Mahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात 'वर्षा'वर साडेचार तास महत्वाची बैठक
महायुतीच्या जागावाटपासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी महत्वाची बैठक बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे बैठकीला उपस्थित असल्याची माहिती विधानसभा निवडणुकीत महायुतीचे मतदारसंघांचे जागावाटप आणि कोण उमेदवार असावेत या संदर्भात महत्वाची चर्चेची माहिती महायुतीच्या प्रमुख नेत्यांची मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षावरील बैठक अपडेट बैठकित स्टँडिंग सीट तसेच तीनही पक्षांनी दावा केलेल्या जागांवर सविस्तर चर्चा तीन पक्षाचा दावा असलेल्या जागांवर कुठला उमेदवार उजवा ठरू शकतो, तिथली राजकीय आणि जातीय समीकरणांसंदर्भातही याचाही विचार झाल्याची सूत्रांची माहिती जिंकूण येणार्या जागा किती, कुठल्या जागांवर अधिक मेहनत घेणं गरजेचं आहे यावर विचार विनिमय झाल्याची असल्याची माहिती निवडणुकीला सामोरे जाताना कुठल्या मुद्यांवर भर द्यायला हवा, कुठले वादग्रस्त मुद्दे प्रकर्षाने टाळायला हवेत, वचननाम्यात नागरिकांशी निघडीत मुद्यांना प्राधान्य असायला हवेत प्रचार आणि सभांची जबाबदारी त्याच बरोबर नियोजन या सर्व गोष्टींवर बैठकित सखोल चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती.... निवडणुकीत तीनही पक्षाची भूमिका ही एकच असायला हवी, एकमेकांवरील टीका, टिप्पणी आणि चिमटे टाळा आप आपल्या पक्षातील अंतर्गत वाद हे प्रत्येक पक्षातील नेत्यांची जबाबदारी राहिल तीनही पक्षांचा दावा असलेल्या जागांवर बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा जागांची घोषणा सर्वात शेवटी करून नाराज इच्छुक उमेदवाराची समजूत काढण्यावर एकमत विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जास्त ताकदीने जागा निवडून आणण्यावर तीनही पक्षातील प्रमुख नेत्यांचे एकमत....