Mahayuti Meeting Delhi : प्रत्येक 'मंत्री' पारखून घेणार, महायुतीच्या बैठकीची Inside Story!

Continues below advertisement

Mahayuti Meeting Delhi : प्रत्येक 'मंत्री' पारखून घेणार, महायुतीच्या बैठकीची Inside Story!

मुख्यमंत्री दरे गावातून परतल्यावर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग येणार का असा सवाल आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 10 दिवस झाले. मात्र अजूनही सरकारचा पत्ता नाही. 5 डिसेंबरला शपथविधी होणार आहे. परंतु अजूनही मुख्यमंत्रि‍पदी कोण असणार याबाबत अधिकृत नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. याचदरम्यान दिल्लीत पार पडलेल्या महायुतीच्या बैठकीची इनसाईड स्टोरी (Mahayuti Delhi Meeting Inside Story) एबीपी माझाच्या हाती आली आहे. 

अमित शाह आणि जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीत बैठक झाली होती. यावेळी अमित शाह यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ पाहणाऱ्या आमदारांच रिपोर्ट कार्ड मागवल्याची माहिती समोर आली आहे. तसेच संबंधित आमदाराचा लोकसभा निवडणुकीवेळी परफॉर्मन्स कसा होता, संबंधित व्यक्तीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीच इमानेइतबारे काम केलं होतं का?, याचा विचार देखील मंत्रिपद देताना विचारत घेतलं जाणार आहे, अशी सूत्रांची माहिती समोर आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram