Mahayuti : महायुतीकडून मनसेला काही जागांवर बिनशर्त पाठिंबा देण्याची शक्यता

Continues below advertisement

Mahayuti : महायुतीकडून मनसेला काही जागांवर बिनशर्त पाठिंबा देण्याची शक्यता 

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) घोषणा झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याचदरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून मनसेला काही जागांवर बिनशर्त पाठिंबा देण्याची शक्यता आहे.   लोकसभा 2024 च्या निवडणुकीत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. कोणत्याही अटी न ठेवता राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं होतं. आता राज ठाकरेंनी लोकसभेला केलेल्या मदतीची बिनशर्त परतफेड महायुतीकडून केली जाणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनूसार समोर येत आहे.  एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा- काही जागांवर पाठिंबा देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची माहिदी देखील समोर येत आहे.  मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शनिवारी रात्री शिंदे-फडणवीस-ठाकरेंमध्ये दोन तास चर्चा झाली. शिवडी, वरळी, माहिमसह काही मतदारसंघांवर ही चर्चा झाल्याचं समोर येत आहे. त्यामुळे आता महायुती आणि मनसेच्या पुढील निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram