Raj Thackeray :महायुतीत नवा भिडू,लोकसभेसाठी प्लॅनिंग,शिंदे,राज ठाकरे आणि Devendra Fadnavisयांची बैठक

Continues below advertisement

Raj Thackeray :महायुतीत नवा भिडू,लोकसभेसाठी प्लॅनिंग,शिंदे,राज ठाकरे आणि Devendra Fadnavisयांची बैठक
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. राज ठाकरे यांनी नुकतीच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी राज ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे देखील उपस्थित होते. राज ठाकरे दिल्लीहून मुंबईत आल्यानंतर काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीचा दौरा केला होता. दिल्लीतील अमित शाह यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस मुंबईत आल्यानंतर त्यांनी रात्री उशिरा राज ठाकरे यांची भेट घेतल्याच्या चर्चा होत्या. आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक होत आहे. वांद्रे येथील हॉटेल ताज लँडस् येथे ही बैठक सुरु आहे. या बैठकीत राज ठाकरे यांची मनसे महायुतीत सहभागी होणार की नाही हे स्पष्ट होईल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram