Mahayuti Delhi Meeting : महायुतीची आज दिल्लीत सर्वात महत्वाची बैठक, जागावाटपावर अंतिम निर्णय होणार?
Continues below advertisement
Mahayuti Delhi Meeting : महायुतीची आज दिल्लीत सर्वात महत्वाची बैठक, जागावाटपावर अंतिम निर्णय होणार?
महायुतीसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. कारण आज रात्री नवी दिल्लीत अमित शाह, जेपी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची बैठक होणार आहे. जागावाटपावर आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. मुळात, महायुतीत देखील जागावाटपावरून मतभेद आहेत हे काही लपून राहिलेलं नाही. मात्र त्यावर नवी दिल्लीत औपचारिक बैठकीत शाह, शिंदे, फडणवीस आणि अजित पवार पहिल्यांदाच चर्चेला बसणार आहेत. शिंदे गट आणि अजित पवार गटानं जरी आपापल्या मागण्या समोर ठेवल्या, तरी अमित शाह अखेर त्यांना किती जागा सोडतात ते सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Delhi Mahayuti ABP Majha Maharashtra News CM Eknath Shinde Lok Sabha Election 2024 Seat Allocation