Mahayuti alliance | विरोधकांनी आत्मचिंतन करावे, महायुती अभेद्य; फडणवीसांचा विरोधकांना टोला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली आहे. जनतेने आपल्याला का नाकारले याचा अभ्यास न करता छाती बढविण्याचं काम करतील, तोवर ते जिंकणार नाहीत, असे फडणवीसांनी म्हटले. लोकांना भ्रमित होण्याचं कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आमची महायुती अभेद्य आहे आणि आम्ही महायुतीमध्येच लढणार आहोत. आम्हाला कोण भेटतो यावरून युती ठरत नाही, अशा शब्दात ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवरही त्यांनी टीका केली. राजकारणामध्ये महायुतीच लढेल आणि महायुतीच जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. फडणवीस म्हणाले, "जनतेने आपल्याला का नाकारलं आहे याचा अभ्यास न करता छाती बढविण्याचं काम करतील, तोवर ते जिंकणार नाहीत." ते पुढे म्हणाले, "लोकांना भ्रमित होण्याचं कारण नाही. आमची महायुती अभेद्य आहे. आम्ही महायुतीमध्येच लढणार आहोत. आम्हाला कोण भेटतं याच्यावरून युत्या ठरत नसतात. राजकारणामध्ये महायुतीचं लढेल आणि महायुतीच जिंकेल." विरोधकांनी आपल्या पराभवाचे आत्मचिंतन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.