Mahavitaran Strike : संपाच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी बोलावली बैठक, तोडगा निघणार?
Continues below advertisement
महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर गेलेत... खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरणचे कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिलीये.. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी हा संप पुकारला आहे. तीन दिवसीय राज्यव्यापी संपामुळे महाराष्ट्रातील भागांत तांत्रिक बिघाड झाल्यास मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यातच संप करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना राज्य सरकराने आता नोटीस बजावली आहे. संपात सहभागी होणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांवर मेस्मांतर्गत कारवाई करण्याच्या इशारा सरकारने दिला आहे.
दरम्यान संपाच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री फडणवीसांनी बैठक बोलावलीेय.. य़ा बैठकीत तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय...
Continues below advertisement