Maharashtra Local Body Polls: महाविकास आघाडी एकत्र लढणार, कोल्हापूर, धुळे, धाराशिवमध्ये महायुतीला देणार आव्हान

Continues below advertisement
राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीने (MVA) कोल्हापूर (Kolhapur), धुळे (Dhule) आणि धाराशिव (Dharashiv) या तिन्ही ठिकाणी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 'महाविकास आघाडी एकत्र निवडणूकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहे,' असे पक्षांनी जाहीर केले आहे. धुळे जिल्ह्यात महायुतीचे पाच आमदार असल्याने त्यांच्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचं चित्र आहे, मात्र स्थानिक निवडणुकांमध्ये MVA ने ऐक्याची भूमिका घेतल्याने लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नसला तरी, नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुका महायुतीच्या नावाने लढण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola