MahaVikas Aghadi Protest : नवी मुंबईत भर पावसात महाविकास आघाडीचे मूक आंदोलन
MahaVikas Aghadi Protest : नवी मुंबईत भर पावसात महाविकास आघाडीचे मूक आंदोलन
महाविकास आघाडी तर्फे बदलापूर घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात मुक आंदोलन करण्यात येत आहे. नवी मुंबईतील वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीतर्फे मुक आंदोलन करण्यात आलं. नवी मुंबईतील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भर पावसात तोंडावर काळ्या फिती बांधत हे आंदोलन केले. यावेळी महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत महिला अत्याचाराविरोधात कडक कायदा करण्याची मागणी केलेय.