Mahavikas Aghadi seat sharing: सांगली, भिवंडी, दक्षिण मुंबई मतदारसंघावरुन महाविकास आघाडीत तिढा
Continues below advertisement
सांगलीच्या जागेवरती काँग्रेस आणि ठाकरे गट, भिवंडीच्या जागेवरती काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट तर दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर कांग्रेस आणि शिवसेना तिढा कायम
हा तिढा सोडवण्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी आज घेतली शरद पवारांची भेट तर शरद पवारांनी दूरध्वनीद्वारे उद्धव ठाकरे यांच्यासोबत केली चर्चा. मात्र कालच्या मातोश्रीवर झालेली बैठक आणि आजच्या फोनवरून झालेल्या चर्चा नंतरही तिढा कायम. हा तिढा निर्माण झाल्यामुळे शिवसेना ठाकरे गट अद्याप आपली यादी जाहीर करू शकलेले नाही. या जागांवरती निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही थेट दिल्लीतील नेत्यांशी बोला असं राज्यातील काँग्रेस नेत्यांची भूमिका. त्यामुळे या तीन जागांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होते की काय अशी चर्चा सुरू?
Continues below advertisement