Zero Hour Full Segment : मविआ ते महायुती, जागावाटप ते मुख्यमंत्रि‍पद, रस्सीखेच सुरुच?

Continues below advertisement

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election 2024) वारे वाहू लागले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असाच सामना रंगणार असल्याचे चित्र आहे. सध्या महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपावरून चर्चा सुरु आहे. त्यातच आता महायुतीत 288 पैकी 168 जागांवर जागा वाटपाचा (Mahayuti Seat Sharing) कोणताही वाद नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत 288 पैकी 168 जागांवर जागा वाटपाचा कोणताही वाद नसल्याची माहिती मिळत आहे. 168 मतदारसंघात महायुतीतील मित्र पक्षांपैकी एकाच पक्षाने त्या त्या जागेवर दावा केल्याने या 168 जागेवरच जागावाटपाचा तिढा सुटला आहे.  यातील बहुतांश जागा सीटिंग-गेटिंग फॉर्म्युल्यामुळे निकाली निघाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

89 जागांचा तिढा कधी सुटणार?

तर 2019 मध्ये पक्षाने जागा जिंकली. मात्र, आमदार शरद पवार गटात किंवा उद्धव ठाकरे गटात आहे, अशा सीटिंग जागा व महायुती समर्थित अपक्षांच्या जागा मिळून जवळपास 31 जागांवरचा पेच निकाली निघाला आहे. मात्र, यावर अंतिम निर्णय होणे बाकी असल्याचे समजते. तर उर्वरीत 89 जागांवर निवडून येण्याची क्षमता या निकषावर चर्चेतून तोडगा काढण्यावर भर असल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे. आता 89 जागांचा तिढा नेमका सुटणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram