Babanrao Lonikar | भाजप नेते बबनराव लोणीकरांचं आक्षेपार्ह वक्तव्य, महिला नेत्यांच्या प्रतिक्रिया | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची जाहीर कार्यक्रमात बोलताना जिभ घसरली आहे. शेतकऱ्यांच्या मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी हिरोईन आणू, असं वक्तव्य बबनराव लोणीकर यांनी केलं आहे. एवढंच बोलून लोणीकर थांबले नाहीत तर त्यानंतर त्यांनी स्टेजवर बसलेल्या तहसीलदार या हिरोईनसारख्याच दिसतात, असं म्हटलं. लोणीकरांच्या भाषणाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. जालना जिल्ह्यातल्या परतूर गावातील एका जाहीर कार्यक्रमात बबनराव लोणीकर बोलत होते. बबनराव लोणीकरांच्या या वक्तव्याने त्यांच्यासाठी शेतकरी प्रश्न किती गंभीर आहेत हे दिसून येत आहे. ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर बबनराव लोणीकरांशी संपर्क साधला असता, त्यांनी ऑडिओ क्लिप माझी असल्याचं मान्य केलं आहे. मात्र मी बोललो त्यात काहीच चुकीचं नसल्याचंही त्यांनी सांगितलं.