Winter Alert : मुंबईत रात्रीत पारा घसरला, हवामान खात्याकडून राज्यात थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज
Continues below advertisement
राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानात घट झाल्याने थंडीची चाहूल लागली आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) येत्या काही दिवसांत राज्यात थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज दिला आहे. मुंबईच्या किमान तापमानात अचानक घट झाल्यामुळे पहाटेच्या वेळी हवेत गारवा जाणवत आहे; रविवारी पहाटे मुंबईचे तापमान १८ अंश नोंदवले गेले, जे शनिवारी २१.२ अंश होते. केवळ मुंबईच नाही, तर पुणे, नाशिक, संभाजीनगरसह मराठवाडा आणि विदर्भातही पारा घसरला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस किमान तापमान २० अंशांच्या आसपास राहील आणि १५ नोव्हेंबरनंतर ते आणखी खाली येण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यात परतीच्या पावसाचा मुक्काम असल्याने हिवाळा लांबला होता, मात्र आता नागरिकांना गुलाबी थंडीचा अनुभव येऊ लागला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement