Mumbai - Nagpur Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्प मार्गी लागणार, समृद्धी मार्गालगत धावण्याती शक्यता
मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सर्व्हेचं काम पूर्ण झालं असून समृद्धी महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा अधिकाधिक वापर करून बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा विचार आहे. बुलेट ट्रेन मार्गाचा काही भाग एलिव्हेटेड तर काही भाग जमिनीखालून जाणार असल्याचं सांगण्यात येतंय.