Remdesivir चा पुरवठा 20 एप्रिलपर्यंत सुरळीत होणार, : अन्न व औषध पुरवठा मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
Continues below advertisement
पुणे : राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरु असताना कोरोना बाधित रुग्णांवर प्रभावी ठरणारे रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. पुण्यालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला आज रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा झालेला नाही. रेमडेसिवीरची निर्मिती करणाऱ्या प्रमुख सात कंपन्या आहेत. त्यातील महत्वाची हेटरो लॅब लिमिटेड या हैदराबाद स्थित कंपनीचा हैदराबादमधील प्लांट बंद असल्याने या कंपनीकडून रेमडेसिवीरचा पुरवठाच बंद करण्यात आलाय. परिणामी राज्यात मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे.
Continues below advertisement