Maharashtra : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, आठवडाभर हवामान कोरडं राहणार, हवामान विभागाचा अंदाज
Continues below advertisement
आधी अवकाळी पाऊस आणि त्यानंतर पडलेलं दाट धुकं, यामुळं अनेक पीकं धोक्यात येण्याची शक्यता होती. मात्र आता आठवडाभर हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे..अरबी समुद्रातील चक्रीय वाऱ्यांचा प्रभाव ओसरला असल्याने कोकणासह राज्यात आता सर्वत्र कोरडे हवामान होणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये बहुतांश भागांत रात्रीच्या किमान तापमानात घट होऊन गारवा वाढण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement