Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा तडाखा : ABP Majha

 महाराष्ट्राने आज एकाचवेळी वातावरणाची दोन रुपं अनुभवली. एका बाजूला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. परभणी, यवतमाळ, हिंगोली, वाशिम, बुलढाणा आणि भंडाऱ्यासह अनेक जिल्ह्यांना अवकाळीने झोडपून काढलंय. त्यामुळे नागरिकांची त्रेधा तिरपीट तर झालीच, मात्र, हातातोंडाशी आलेल्या पिकांचा शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर चिखल झाला. तर दुसऱ्या बाजूला अनेक जिल्ह्यांत सूर्याने अक्षरश: उन्ह ओकलंय. त्यामुळे लोकांच्या अंगाची लाहीलाही झालीय. एकूणच, आपण एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवशी एप्रिल फुल्ल करत असतो मात्र, वातावरणाने आज एप्रिलच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्राचं एप्रिल फुल्ल केलंय 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola