Maharashtra Weather Update : यंदा मान्सूनचं आगमन उशिराने होणार, 4 जून रोजी केरळमध्ये दाखल होणार

Continues below advertisement

 यंदा मान्सून (Monsoon) अंदमानमध्ये (Andaman) उशिराने दाखल होण्याचा अंदाज आहे. हवामानाची माहिती देणारी स्कायमेट वेदर (Skymet Weather) या खासगी संस्थेने हा अंदाज वर्तवला आहे. मान्सून अंदमानमध्ये साधारणत: 22 मे रोजी दाखल होत असतो. मात्र यंदा त्याची सुरुवात कमकुवत दिसत आहे. त्यामुळे यंदा मान्सून अंदमानमध्ये विलंबाने दाखल होण्याचा अंदाज स्कायमेटच्या शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. तसंच केरळात नैऋत्य मान्सून साधारणपणे 1 जून रोजी दाखल होत असतो, मात्र नैऋत्य मान्सूनसंदर्भात आताच सांगणं कठिण असल्याचं मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं  आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram